शनिवार आणि रविवार भुशी डॅमकडे जाणारा रस्ता बंद

0
590

पुणे, दि.१४ (पीसीबी) – पर्यटकांची जास्त गर्दी असणारा डॅम म्हणजे भुशी डॅम. लोणावळ्यातल्या भुशी डॅमवर पर्यटकांची पावसाळ्यात कायमच गर्दी होत असते. मात्र दुपारी ३ वाजल्यापासून या धरणाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. दर शनिवार रविवार हा रस्ता बंद राहणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी दिली.

भुशी डॅम कडे जाणारा मार्ग,राईवूड चौक हा बंद असणार असून ३ वाजता,चालत जाऊ शकता.भुशी डॅम ५ वाजता बंद राहणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी दिली आहे. शनिवार आणि रविवार असला की लोणावळ्यातून भुशी धरणाकडे जाणाऱ्या मुख्य चौकात वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे आज पासून दुपारी तीन च्या सुमारास भुशी धरणाकडे जाणारा मार्ग हा राईवूड चौक येथे बंद करण्यात आला आहे.हा नियम केवळ शनिवार आणि रविवारसाठी असणार आहे.

लोणावळ्यामधून भुशी धरण हे अडीच किलोमीटर आहे,रस्त्या अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होते.तरुण तरुणी या मौज मजा करण्यासाठी आले असल्याने डोंगरावर फिरण्यासाठी जातात.फोटो,सेल्फी यामधून अपघात होण्याची शक्यता असते यासाठी पर्यटकांनी अश्या ठिकाणी जाण्याचे शक्यतो टाळावे.

भुशी धरण येथे भाजलेले मक्याचे कणीस,वडापाव,गरमागरम भजी,वाफाळलेला चहा याच्यावर पर्यटक ताव मारतात. भाजलेले मक्याच्या कणसाचा व्यवसाय जास्त चालतो. मुंबई आणि पुण्याहून आलेले पर्यटक हे भाजलेल्या कणसावर ताव मरतात. मात्र आता दर शनिवार रविवार या धरणाकडे जाणारा रस्ता बंद राहणार आहे.