शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आवश्यक ‘या’ चाणक्य नीती तुम्हाला माहिती आहेत का…

0
839

चाणक्यांबद्दल आज सर्वांना माहिती आहे. त्यांचं बुद्धी चातुर्य, त्यांची न्यायपद्धत, त्यांची शिकवण यामुळे ते ओळखले जातात. त्यांनी आपल्या बुद्धी आणि धोरणाच्या बळावर चंद्रगुप्ताला शासक बनविले. चाणक्यांना राजकारणाची खूप चांगली माहिती होती.चाणक्य यांनी आपल्या आयुष्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितींचा कठोर सामना केला आहे. तरीही आपल्या आत्मविश्वास डळमळू दिला नाही. चाणक्याने आपल्या शत्रूंवर विजय मिळवून इतिहासाच्या प्रवाहाला नवे वळण दिले. चाणक्य नीतींमध्ये अत्यंत प्रभावी गोष्टींना नमूद केले आहे. ज्या आपल्या खूप फायद्याच्या ठरतात….

१. शत्रूंच्या सर्व हालचालीकडे आपले लक्ष असावे-
चाणक्याच्या शिकवणीनुसार शत्रूंच्या प्रत्येक कृतीकडे आपले लक्ष आवश्यक आहे कारण शत्रूची टाकत आणि कमजोरी आपल्याला माहिती असेल तर आपण त्याला सहज पराभूत करू शकतो. म्हणून त्याच्या प्रत्येक क्रियेवरती आपलं लक्ष हवं.

२. कोणालाही कमी लेखू नये-
चाणक्याच्या नीतीनुसार जेव्हा शत्रू आपल्यापेक्षा जास्त सामर्थ्यवान असेल, तर त्यावेळी शांत राहावं आणि योग्य वेळेची वाट पाहावी.आणि त्यानंतरच आपले स्वतःचे सामर्थ्य वाढविण्याकडे लक्ष द्यावे आणि योग्य नियोजन करावे , त्यावर काम करावे. आपले साथीदार आणि हितचिंतक एकत्रित करून रणनीती बनवून त्यानुसार शत्रूंवर हल्ला करावा. ज्यामुळे आपण सहजच शत्रूंचा पराभव करू शकाल. चाणक्याची नीती सांगते जेव्हा शत्रू सामर्थ्यवान असतो तेव्हा शांततेने काम करण्याची वेळ असते. योग्य रणनीती बनवून शत्रूंचा सामना करावा

३. लपून बसलेल्या शत्रूचा कसा पराभव कराव-
या जगात प्रत्येकाचे शत्रूं असतात. जो यशस्वी असतो त्याचे शत्रू असतातच. त्यापैकी काही शत्रू माहीती असतात तर काही अज्ञात शत्रू असतात. हे माहित नसलेले शत्रू आपल्याला थेट नुकसान न देता लपून आपल्या मागून हल्ला करतात. असे शत्रू नेहमीच खूपच घातक ठरतात. अशा शत्रूंचा शोध घेण्यासाठी अत्यंत सावधगिरी बाळगायला हवी. अचानक झालेल्या हल्ल्याला न घाबरून जाता शत्रूच्या प्रत्येक हालचाली चा दृढपणे सामना करून त्याला लढा दिला पाहिजे.