शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ?

0
562

पाटणा, दि. २३ (पीसीबी) – मोदी सरकारला घरचा आहेर देणारे व पक्षविरोधी नेहमी कुरघोडी करणारे   भाजपचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा यांचे तिकीट कापण्यात आले आहे.  शत्रुघ्न सिन्हा यांच्या पाटणासाहिब या मतदारसंघात केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  

तिकीट कापल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा  नाराज झाले आहेत. त्यामुळे ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे बोलले जात आहे. सिन्हा २४ किंवा २५ मार्चला काँग्रेस प्रवेशाची घोषणा करतील, असे सिन्हा यांच्या निकटवर्तीयांकडून  सांगितले जात आहे.

दरम्यान, सिन्हा यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर चौफेर हल्ला चढवला होता. विशेष म्हणजे त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली आहे. यामुळे त्यांच्यावर पक्षांकडून कारवाई केली जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, पक्षाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र, आता सिन्हा यांचे लोकसभेचे तिकीट कापून त्यांना योग्य तो संदेश दिल्याचे बोलले जात आहे.