Desh

शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा लव सिन्हाला पराभवाचा धक्का!

By PCB Author

November 10, 2020

पाटणा, दि. १० (पीसीबी) काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांचे सुपुत्र लव सिन्हा याला पराभवाचा धक्का बसला आहे. बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या नितीन नवीन यांनी लव सिन्हाचा पराभव केला आहे.  बांकीपूर विधानसभा मतदारसंघात नितीन नवीन हे सलग चौथ्यांदा आमदार झाले आहेत. त्यांनी 33 हजारांपेक्षा जास्त मतं मिळवत विजय मिळवला.

एकूण मतांपैकी 61 टक्क्यांपेक्षा अधिक मतं नितीन नवीन यांना मिळाली आहेत. जवळपास 18 हजारांच्या मताधिक्याने नितीन नवीन विजयी झालेत.  दरम्यान, बांकीपूर विधानसभा मतदारसंघ हा पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. या मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा भाजपच्या तिकिटावर विजयी झाले आहेत.