Pune

शंभर नगरसेवक आमदार आठ… पुण्याच्या पाण्याची लावली वाट; पोस्टरमधून सत्ताधारी भाजपवर निशाणा  

By PCB Author

January 20, 2019

पुणे, दि. २० (पीसीबी) – केंद्र, राज्य आणि महापालिकेतील सत्ताधारी  भाजपच्या कारभाराविरोधात   पोस्टरबाजीतून  आज (रविवार) लक्ष्य करण्यात आले आहे.  शहरातील अनेक भागात गल्ली ते दिल्ली तुमचा थाट… शंभर नगरसेवक आमदार आठ… पुण्याच्या पाण्याची लावली वाट… तुमच्या कारभाराला कंटाळलेला एक पुणेकर, अशा आशयाचा मजकूर असलेले पोस्टर शहरातील अनेक भागात लागले आहे. हे पोस्टर शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

कोणतीही पूर्वसूचना न देता जर पुण्याचा पाणी पुरवठा विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला होता.  यावर  पाटबंधारे खात्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्यात येईल, अशा  शब्दात महापौर मुक्ता टिळक यांनी अधिकाऱ्यांना सुनावले होते. तसेच अधिकाऱ्यांनी पाणी तोडल्या प्रकरणी पुणे महापालिकेच्या सर्व साधारण सभेत देखील त्याचे पडसाद उमटले होते.

दरम्यान, पाणी प्रश्नावरून घडामोडी घडत असताना आज पुणे शहरातील अनेक चौकामध्ये  पोस्टर लागले आहे. हे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. तसेच पुणे महापालिकेत पहिल्यांदा  मोठ्या प्रमाणात भाजपला पक्षाला बहुमत मिळाले आहे. भाजपकडून पाणी प्रश्न सोडविण्यात अपयशी आल्याने ही पोस्टरबाजी करण्यात आल्याची चर्चा  सुरू झाली  आहे.