Pune

शंभरावर पिस्तूल जप्त करणाऱ्या ‘पीएसआय शाकिर जिनेडी’ यांचा सन्मान 

By PCB Author

January 28, 2021

पुणे, दि.२८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय क्षेत्रात शंभरावर पिस्तूल जप्त करणाऱ्या पीएसआय शाकिर जिनेडी यांचा राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मान पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले. 

जिनेडी हे १९८७ मध्ये पोलीस दलात भरती झाले आहेत. पोलीस दलामध्ये त्यांची ३३ वर्षे सेवा झालेली असुन त्यामध्ये त्यांनी गुन्हे शाखा व तपास पथकात कर्तव्य बजावले आहे. पोलीस सेवेतील कालावधी मध्ये त्यांनी १०० पेक्षा जास्त अग्निक्षस्त्रे जप्त केली आहेत. अग्निशस्त्राचा वापर करुन झालेला खुन, तसेच, अनोळखी इसमाचा झालेला खुन अशा क्लिष्ट स्वरुपाचे गुन्हयांचा काही एक सुगावा नसताना अंत्यत चिकाटीने कौशल्यपुर्वक तपास करुन पाच गुन्हयांचा छडा लावला आहे. चेन स्नॅचिग जबरी चोरी गुन्हयाचे ४२ गुन्हे उघडकीस आणुन १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करणेकामी मदत केली आहे. तसेच, घरफोडी चोरी गुन्हयाचे ११० गुन्हे उघडकीस आणुन यातील एक कोटी १० दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करणेकामी मदत केली आहे. 

सन २०१२ मध्ये पिपंरी पोलीस स्टेशन येथे एका लहान मुलाचे अपहरण झाले बाबत दाखल झालेल्या गुन्हयाचा ४८ तासाचे आत छडा लावुन महिला आरोपीस अटक करण्यास मदत केली आहे. त्यांचे उल्लेखनीय कामगिरी बाबत त्यांना तत्कालीन मा गृहमंत्री , महाराष्ट्र राज्य यांचेकडुन दहा हजार रोख पुरस्कार प्राप्त झाला आहे. सन २०२० मध्ये चाकण -शिक्रापुर रोडने एका कारमध्ये अंमली पदार्थ घेवुन जात असल्याची बातमी मिळाल्याने वीस कोटी ५ लाख २३ हजार १०० रुपयांचा २० किलो मेफेड्रॉन ( एम.डी ) हा अंमली पदार्थ जप्त करणेकामी मदत केली आहे. शाकीर जिनेडी यांना सुमारे ४६० रिवॉर्ड प्राप्त झाले आहेत . ते उत्कृष्ट अॅथलॅटीक्स खेळाडु असुन त्यांना सन १९८९ मध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडुचा मान मिळाला आहे. त्यासाठी त्यांना पोलीस महासंचालकांचे सर्वोत्कृष्ट खेळाडुचे पोलीस पदक मिळाले आहे. तसेच, राष्ट्रीय पोलीस खेळात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांना ०६ सुवर्ण पदक, ०५ रजत पदक व ०२ कास्य पदक मिळाले आहेत. सन २०१७ मध्ये पोलीस दलातील प्रशंसनीय सेवेसाठी गौरव करुन मा.पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे. शाकीर जिनेडी यांना पोलीस दलातील उल्लेखनिय सेवेबद्दल सन २०२० चे राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे.