Pimpri

व्हॉट्सॲपवर अश्लील मॅसेज पाठवून महिलेचा विनयभंग

By PCB Author

June 19, 2021

सांगवी , दि. 19 (पीसीबी) : व्हॉट्सॲपवर अश्लील मॅसेज पाठवून महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित इसमावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 ते 18 जून 2021 दरम्यान सांगवी परिसरात हा प्रकार घडला.

याबाबत पीडित महिलेने शुक्रवारी (दि.18) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9975618342 या मोबाईल क्रमांकधारक अज्ञात इसमाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9975618342 या मोबाईल नंबर धारक अज्ञात आरोपीने फिर्यादी महिलेला व्हॉट्सॲपवर अश्लील मॅसेज पाठवून विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. आधिक तपास पोलीस निरीक्षक अजय भोसले करीत आहेत.