व्हॉट्सअॅप, टेलिग्राम सुरक्षित नाही; हॅकर्सकडून धोका

352

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडियावर हॅकर्सची नेहमीच नजर असते. व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामच्या एन्ड टू एन्ड एन्स्क्रिप्शन सेक्युरिटीवर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर खबरदार. कारण तुमच्या सोशल मीडिया अॅपमध्ये छेडछाड करणे हॅकर्सला सहज सोपे असून ते तुमच्या व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राममधील पर्सनल डाटा लिलया चोरू शकत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवर तुमचे फोटो, महत्त्वाच्या फाइल्स शेअर करताना खबरदारी घ्या.

व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवर तुम्हाला ज्या इमेज आणि ऑडिओ दिल्या जातात त्यात हॅकर्स छेडछाड करू शकतात, असा इशारा सायबर सेक्युरिटी फर्म ‘सायमन्टेक’ने दिला आहे. सोशल मीडियाच्या सेक्युरिटीत मीडिया फाइल जेकिंगमध्ये अनेक त्रुटी आहेत. व्हॉट्सअॅपमध्ये अनेक फिचर्स तुम्ही डिलिट केल्यास त्यात छेडछाड करणे हॅकर्सला अधिक सोप्पे जाते. व्हॉट्सअॅपमधील फाइल्स एक्सर्नल स्टोरेजमध्ये आपोआप सेव्ह होतात. टेलिग्राममध्ये सेव्ह टू गॅलरी अनेबल केल्यास टेलिग्रामचे सर्व व्हिडिओ आणि फोटो एक्सर्नल मेमरीत सेव्ह होतात. या दोन्ही अॅपमधील मीडिया फाइलचा जेकिंगपासून बचाव होईल, अशी कोणतीही सुविधा या दोन्ही सोशल मीडिया अॅपमध्ये नाही. त्यामुळे हॅकर्स या त्रुटीचा गैरफायदा घेऊन यूजर्सची डोकेदुखी वाढवू शकतात. तुमचे पर्सनल फोटो आणि व्हिडिओ हॅक करू शकतात. याशिवाय कार्पोरेट डॉक्युमेंट, इन्व्हाइस, स्कॅन करण्यात आलेल्या फाइलीसहीत अनेक फाइली कॉपी करू शकतात.