व्हॉट्सअॅपवर अश्लिल मेसेज पाठवून तरुणीचा विनयभंग

0
836

शिंदेवाडी, दि. ७ (पीसीबी) – तरुणीच्या मोबाईलवर तसेच व्हॉट्सअॅप क्रमांकावर अश्लिल मेसेज पाठवून विनयभंग केला. त्यानंतर बघुन घेण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १४ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान घडली.

याप्रकरणी १८ वर्षीय पीडित तरुणीने पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, होमगार्ड असलेल्या आखाडे नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत आरोपी आखाडे याने पीडित तरुणीचा वारंवार पाठलाग केला. तसेच तरुणीचा मोबाई क्रमांक मिळवून ९०४९३७७९४८ व ८९७५०४४८४८ या दोन मोबाईल क्रमांकांवरुन तरुणीच्या मोबाईलवर आणि व्हॉट्सअॅपवर अश्लिल मेसेज पाठवून विनयभंग केला. तसेच “तु माझा फोन का उचलत नाही तुझ्याकडे नंतर बघतो”,  अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडितेने पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मात्र अद्याप आरोपी आखाडे याला अटक करण्यात आलेली नाही. पोलिस शिपाई दुधभाते तपास करत आहेत.