व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधत रोहित पवारांनी केली ‘केंद्र सरकारच्या’ धोरणांवर टिका

0
287

मुंबई,दि.१४(पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधून केंद्र सरकारच्या धोरणांना लक्ष्य केलं. आहे. केंद्र सरकारच्या अपयशामुळेच महागाई वाढत आहे. त्यामुळेच आज स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत ९१० रुपये झाल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

रोहित पवार यांनी तरुणांना प्रेम दिनाच्या शुभेच्छा देताना तरुणांना सल्लाही दिला आहे. ते म्हणाले, “हा दिवस स्वच्छ आणि खऱ्या अर्थानं निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे. आज तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या… गॅसचा दर ९१० रुपये प्रती सिलिंडर झालाय.” रोहित पवार यांनी ट्विट करत हे मत व्यक्त केलं.

दरम्यान, महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला पुन्हा एकदा गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाल्यानं मोठा धक्का बसला आहे. इंडियन गॅसच्या विना अनुदानित असलेल्या गॅस सिलेंडरच्या दरात 145 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली. दिल्ली विधानसभा निवडणुका पार पडताच गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्याने सरकारबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे.