व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्सनी लाँच केले कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर

0
536
ऊस उत्पादकांसाठी एंड टू एंड पर्याय असलेल्या व्हीएसटी शक्ती ग्रो टेकचे पदार्पण २०% पर्यंत उत्पादकता वाढण्याची शक्यता

पिंपरी, दि.१७ (पीसीबी) – व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेड (व्हीएसटी ट्रॅक्टर्स) पाच दशकांहून अधिक काळ टिलर आणि कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरच्या निर्मितीमध्ये अग्रगण्य आहे. कृषी क्षेत्राला नवीन उपाय देण्याच्या निरंतर प्रयत्नांचा एक भाग म्हणून शेतकर्‌यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या भारत सरकारच्या महत्वाकांक्षी संकल्पाला अनुसरून जीआरओ टेक हे – वन लाईन सोल्युशन ट्रॅक्टर बाजारात आणला आहे.

पहिल्या टप्प्यात उत्पादनक्षमतेसाठी ऊस उत्पादकांना अनुकूल ग्रो टेक लाईन देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त ऊस उत्पादकांना कामगार, पाणी, वेळ आणि इंधन वाचविण्यात मदत करण्यासाठी सोल्युशनची ग्रो टेक लाइन कॅलिब्रेट केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, सर्व उपकरणांसह ग्रो प्रो सोल्यूशन प्रत्यक्ष जमिनीवर उपलब्ध करण्यासाठी सुरुवातीची गुंतवणूक उच्च एचपी ट्रॅक्टरच्या तुलनेत ५०% कमी अपेक्षित आहे. कमी देखभालसह उच्च उर्जा हे या उत्पादनाची विशिष्ट वैशिष्ट्‌य आहे आणि कृषी आणि मालाची वाहतुक या दोन्हीसाठी हे उपयुक्त आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. शेतकर्‌यांना केवळ उत्पादकता सुधारण्यास मदत होणार नाही तर कामगार, शेती साधने, लागवड व कापणी यासह अनेक खर्चाचे अनुकूलन करण्यात मदत होईल. अशी नाविन्यपूर्ण दर्जेदार उत्पादने व सरलीकृत प्रणालीं विषयी व्हीएसटीची अतूट कटिबद्धता व्हीएसटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अँटनी चेरुकारा स्पोक यांनी

व्यक्त केली. पुढे जाऊन शेतकर्‌यांच्या उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने व्हीएसटीने पीकांवर लक्ष केंद्रीत केलेले असेल, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. ग्रो टेक सोल्यूशनचा एक भाग म्हणून, आम्ही ईंधन कार्यक्षम कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर व्हीएसटी शक्ती विराट एमटी २७० ऑफर केल्याबद्दल आम्हाला आनंद होतो आहे. आणि ऊस यांत्रिकीकरणाचे संपूर्ण समाधान आहे. हे यांत्रिकीकरण आधुनिक शेतीत २० टक्क्‌यांपर्यंत उत्पादकता वाढवू शकेल, असा अंदाज आहे. व्हीएसटी शक्ती एमटी २७० इंधन कार्यक्षम ४-सिलेंडर इंजिन, पॉवर स्टीयरिंग ऑप्शनल, ओआयबी, स्मार्ट हायड्रॉलिक्स, अल्ट्रा कूलिंग रेडिएटर, ६ + २ स्लाइडिंग मेष गियर बॉक्ससह स्वयंचलित खोली आणि ड्राफ्ट कंट्रोलसह आणि वर्ग २.१ मीटर टर्निंग रेडियससह सर्वोत्कृष्ट आहे. कमी इंधनाच्या वापरासह चांगले कव्हरेज देण्याची ग्वाही यामुळे दिली जाते.

व्हीएसटी शक्ती विराट एमटी २७० च्या यांत्रिकीकरणामुळे स्मार्ट साधनांचा चांगला वापर करून कमी जमीन धारणा आणि कमी मजुरीमधील तफावत दूर करते. हे उत्पादनक्षमता वाढवून शेतक शरीश्‌यांना सहजपणे उंबरठा ओलांडण्यास मदत करते, असेही ते पुढे म्हणाले. कार्यक्रमात, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. जुझारसिंग विर्क यांनी महाराष्ट्रातील शेतकर्‌यांसाठी ४५ एचपी आणि ५० एचपी उत्पादने बाजारात अधिकृतपणे लॉंच केले आणि त्याच्या किल्ल्‌या ग्राहकांच्या स्वाधीन केल्या.

द्राक्षे, डाळिंब उत्पादकांना उच्च टॉर्क ४ डब्ल्यूडी ट्रॅक्टरची विशेष आवश्यकता होती. आज व्हीएसटीने ६०० लिटर स्प्रेयरसह काम करणारे उच्च टॉर्क इंजिनसह हे मॉडेल लॉंच केले आहे. उच्च टॉर्क आणि डिझेल बचत ही या उत्पादनाची खासियत आहे. व्हीएसटी शक्ती एमटी २७० उच्च टॉर्क बोनेटच्या फेसलिफ्टसह बर्‌याच तांत्रिक आणि दमदार वैशिष्ट्‌यांसह आहे. यामुळेच हे या उत्पादनाला विन-विन ट्रॅक्टर बनवते.व्हीएसटी शक्ती एमटी २७० हाय टॉर्क डमदार टॉर्क आणि डमदार डिझेल क्षमथासह आहे. त्यामुळेच तो ‘इंडियाचा खरा विन विन ट्रॅक्टर’ असेल. २७ एचपी हाय टोक ट्रॅक्टर – इंडिया का विन विन ट्रॅक्टर आणि त्याच व्यासपीठावर हाय एचपी ट्रॅक्टर लॉंच करणे हा एक सेलिब्रेशनचा क्षण आहे, असे मत महाराष्ट्राचे एजीएम नूर मोहम्मद शेख यांनी व्यक्त केले. येत्या काही दिवसात ग्रो टेक आमच्या नेटवर्कमधून महाराष्ट्रभर लॉंच करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला श्री. शरद पवार हे देखील होते. श्री. पवार यांनी व्हीएसटी शक्ती ग्रो टेक स्टॉललाही भेट दिली.