व्यापारी राजेश नहार खून प्रकरणातील आरोपींना अटक

0
445
संग्रहित

जालना, दि.२३ (पीसीबी) –  परतूर येथील व्यापारी राजेश माणिकचंद नहार यांचा ११ जानेवारी रोजी  रात्री १०:३० च्या सुमारास जालना मंठा रोडवर शिंगाडे पोखरी पाटी जवळ अज्ञात आरोपींनी गावठी पिस्टलने गोळी झाडून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि मौजपुरी पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. न्यायालयाने त्यांना ९ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

(१)रघुविरसिंग चंदुसिंग टाक (रा.परतुर,ता.परतुर,जालना), (२)अरविंद ऊर्फ बाळु अर्जुन भदरगे(रा.अंबा ता.परतुर, जालना) असे या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परतुर शहरातील  व्यापारी राजेश माणिकचंद नहार हे त्यांच्या कार ने परतुर कडून जालना कडे येत असताना ११ जानेवारी रोजी रात्री १०:३० च्या सुमारास जालना मंठा रोडवर शिंगाडे पोखरी पाटी जवळ अज्ञात आरोपींनी  गावठी पिस्टलने गोळी झाडून त्यांची हत्या केली होती. दरम्यान, पोलिस अधीक्षक एस.चैतन्या, अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार व स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्रसिंग गौर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली होती. या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेवून पोलिस अधीक्षक चैतन्या यांनी आरोपींचा तपास लावण्यासाठी तीन वेगवेगळी पथके तयार करून त्यांना सूचना दिल्या होत्या. सदर प्रकरणातील मौजपुरी पोलिस ठाण्यात भादवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी परतूर, मौजपुरी आणि स्थानिक गुन्हे शाखा जालना असे तीन पथके काम करीत होते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गौर हे स्वत: त्यांच्या पथकासह परतूर शहर व परिसरात आरोपींचा शोध घेत असताना त्यांना त्यांच्या खास खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, नहार खून प्रकरणाच्या गुन्ह्यात रघुविरसिंग टाक व अरविंद भदरगे यांचा सहभाग आहे. या माहिती आधारे या दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून मौजपुरी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले  असता त्यांना न्यायालयाने ९ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक एस. चैतन्या, अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंग गौर, पोलिस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, पो.हेकॉ सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, पो. गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, अंबादास साबळे, हिरामण फलटणकर, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, संदिप मांटे, विलास चेके करीत आहेत या प्रकरणाचा पुढील तपास सा.पोलिस निरीक्षक मेंगडे पोलिस ठाणे मौजपुरी हे करीत आहेत.