Pune

व्यसनेच्या आहारी गेलेल्या नातवाने केला आजीचा खून

By PCB Author

September 29, 2019

पुणे, दि.२९ (पीसीबी) – व्यसनेच्या आहारी गेलेल्या बावीस वर्षीय नातवाने आजीचा उशीने तोंड दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे येथील सनशाइन सोसायटी, कल्याणीनगर  घडला आहे. नातवास हिमाचल प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.

ओशम संजय गौतम (वय २२, रा. हिमाचल प्रदेश) असे खून करणाऱ्या आरोपी नातवाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, .चांदणी चौहान (वय ६७, रा. सनशाइन सोसायटी, कल्याणीनगर) असे खून झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मनीष आनंद पिंपुटकर (वय ४३, रा. शिवाजीनगर ) यांनी फिर्याद दिली होती.आरोपी ओशम हा चांदणी चौहान (वय६५)  यांचा नातू आहे. ओशम पाच वर्षांचा असताना त्याच्या आईचा विमान दुर्घटनेत अपघाती मृत्यू झाला होता. ओशम जस जसा मोठा होत गेला, तसा तो व्यसनाधीन झाला. आईच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या पैशांवरून त्यांच्यात वाद सुरू झाले. याबाबत चांदणी यांनी आपल्या मुंबईत राहणाऱ्या भावाकडे ओशमची तक्रार केली होती. यादरम्यान, ओशम हिमाचल प्रदेशमध्ये मित्रासोबत राहत असताना त्याची दुचाकी आणि एटीम कार्ड चोरून पळून गेला होता. मित्राच्या चोरलेल्या एटीममधून त्याने दीड लाख रुपये काढले. त्यानंतर काही दिवसांनी तो पुण्यात आजीकडे आला. येथे पुन्हा त्यांच्यात पैशावरून भांडणे झाली. त्या भांडणात ओशमने उशीने आजीचे तोंड दाबून खून केला. खून केल्यावर घरातील पैसे आणि काही दागिने चोरून पुन्हा हिमाचल प्रदेशला पळून गेला. कल्याणीनगरला गेल्यावर त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे समजल्यावर पोलिसांना माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी फ्लॅटचे दार तोडल्यावर चौहान यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडून आला. पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केल्यावर ओशमचे नाव पुढे आले. खून केल्यानंतर नातू हिमाचल प्रदेशाला पळून गेला होता. एका चोरीच्या गुन्ह्यात  हिमाचल प्रदेश  पोलिसांनी त्याला अटक केली असून, कायदेशीर प्रकिया पूर्ण केल्यावर येरवडा पोलिसांना त्याचा ताबा देण्यात येईल अशी माहिती मिळतीये पुढील तपास पोलिस करत आहे.

– युनूस शेख, वरिष्ठ निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे