वैभव राऊतच्या चौकशीत धक्कादायक माहिती; बॉम्ब बनविण्यासाठी इंटरनेटवरून घेतले होते धडे

0
1154

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – नालासोपारा येथे सापडलेल्या शस्त्रे आणि स्फोटकांप्रकरणी अटकेत असलेल्या वैभव राऊत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी इंटरनेटवरून बॉम्ब बनविण्याचे धडे घेतल्याचे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) ने केलेल्या चौकशीतून समोर आले आहे.  या स्फोटके प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता एटीएसच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. 

एटीएसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसला शरद कळस्कर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगारकर यातिघांकडे सापडलेल्या पुस्तकांमध्ये स्फोटकांची माहिती होती. शिवाय त्यांनी कागदावर रेखाटलेली सर्किटही सापडली. हे सर्व जण बॉम्ब कसे बनवायचे हे इंटरनेटवरून शिकत होते. ठाणे येथील गडकरी रंगायतन, पनवेल आणि गोवा येथे स्फोट घडविण्याचा प्रयन्त झाला. मात्र हे तीनही प्रयत्न अयशस्वी झाले. असे पुन्हा होऊ नये म्हणून वैभव राऊत आणि त्याच्या साथीदारांनी बॉम्ब बनविण्याचे धडे इंटरनेटवरून गिरवल्याचे चौकशीतून पुढे आले आहे.