Maharashtra

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही – उच्च न्यायालय

By PCB Author

May 02, 2019

नागपूर, दि. २ (पीसीबी) – यंदाच्या शैक्षणिक सत्रात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई  उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला.

दंतवैद्यक व वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण (एसईबीसी) पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यावर आक्षेप घेणाऱ्या डॉ. आदिती गुप्ता, डॉ. अनुज लद्दड, डॉ. रशिका सराफ यांच्यासह इतर उमेदवारांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

एसईबीसी कायद्यातील कलम ४ मध्ये एकूण जागांच्या १६ टक्के जागा एसईबीसी प्रवर्गाकरिता राखीव ठेवण्यात याव्यात असे नमूद आहे, तर संवैधानिक आरक्षण एकूण उपलब्ध जागांवर लागू करण्यात येत आहे. यास्थितीत एसईबीसी कायद्यातील आरक्षण हे घटनाबाह्य आहे. त्याशिवाय एसईबीसी कायद्याच्या कलम १६ (२) नुसार एखाद्या कोर्सची प्रवेश प्रक्रिया कायदा लागू होण्यापूर्वी सुरू झालेली असेल तर आरक्षण लागू होणार नाही, असे नमूद केले आहे.