Pune Gramin

वेहेरगाव येथील तुरे लॉजवर युवकावर गोळीबार

By PCB Author

July 23, 2019

मळवली, दि.२३ (पीसीबी) – कार्ला एकविरा देवी गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेहेरगाव येथील तुरे लॉजवर  एका युवकावर गोळ्या झाडण्यात आल्या.या प्राणघातक हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (मंगळवार)  पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंथन सातकर(रा.कान्हे, मावळ) हा युवक या हल्ल्यात जखमी झाला असून त्याच्या खांद्याला गोळी लागली आहे. कामशेत येथील  शिंदे नामक युवकाने हा गोळीबार केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

या घटनेची माहिती समजताच लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिपक लुकडे, वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, कामशेतचे पोलीस निरीक्षक दबडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील व लोणावळा उपविभागाचे प्रभारी पोलीस अधिकारी टोणपे यांनी घटनास्थळाला भेट देत तपास सुरू केला.