Desh

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

By PCB Author

July 21, 2019

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्त्वाखाली  टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात  टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी सामने होणार आहेत. त्यासाठी खेळाडूंची निवड  करण्यात  असून निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी टीम इंडियाची आज (रविवार) घोषणा  केली.

३ ऑगस्टपासून भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. विडींज दौऱ्यात टीम इंडिया  ३ टी-20 सामने,  ३ एकदिवसीय आणि २  कसोटी सामने खेळणार आहे.

महेंद्रसिंह धोनीने या दौऱ्यातून माघार घेतली आहे. तर जसप्रीत बुमराहला या दौऱ्यात विश्रांती  दिली आहे. विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे दिनेश कार्तिक आणि केदार जाधव यांना संघातून वगळण्यात आले आहे.

विश्वचषकादरम्यान दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या शिखर धवनचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच कसोटी संघामध्ये यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने देखील पुनरागमन केले आहे.

एकदिवसीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार) , शिखर धवन, के एल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खालील अहमद, नवदीप सैनी

कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अगरवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा, उमेश यादव

टी- 20 संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), कृणाल पंड्या, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर , नवदीप सैनी