वेस्ट इंडिजविरूध्दच्या कसोटीत विराटने झळकावले २४ वे शतक

0
465

राजकोट, दि. ५ (पीसीबी) – वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताच्या पृथ्वी शॉच्या पाठोपाठ कर्णधार विराट कोहली याने शतक झळकावले आहे. विराटचे हे २४ वे कसोटी शतक आहे. ७२ कसोटी सामन्यांमध्ये २४ शतके झळकावणारा  विराट  पहिला फलंदाज ठरला आहे. 

विराटने कमी कसोटी सामने खेळून २४ शतकांचा टप्पा पार केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग चॅपलने ८७ सामन्यांमध्ये तर, पाकिस्तानच्या जावेद मियाँदादने १२४ सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला होता. या सगळ्यांना मागे टाकत विराटने ७२ सामन्यांमध्येच ही कामगिरी केली आहे. याचबरोबर भारतीय मैदानांवर विराटने ३ हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. याआधी इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत दहा डावांमध्ये  विराटने ५९३ धावा जमवल्या होत्या.

दरम्यान, विराटने घरगुती मैदानावर ५३ सामन्यांमध्ये ३ हजार धावा केल्या आहेत. याआधी ब्रायन लारा आणि चेतेश्वर पुजारा यांनीही ५३ सामन्यांमध्येच ३ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. डॉन ब्रॅडमनने सर्वात कमी ३७ सामन्यांमध्ये घरगुती मैदानांवर ३ हजार धावांचा टप्पा गाठला होता.