वेताळनगर व चाफेकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहिदांना श्रध्दांजली   

0
844

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – पुलवामा येथे अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय वीर जवानांना चिंचवड विधानसभेतील वेताळनगर व चाफेकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  श्रध्दांजली  अर्पण करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते व नगरसेवक.विठ्ठल उर्फ नाना काटे,  माऊली सूर्यवंशी, पिंपरी चिंचवड सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विनोद कांबळे, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.