Pimpri

वृद्ध महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

By PCB Author

October 15, 2020

निगडी, दि. १५ (पीसीबी) – दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना बुधवारी (दि. 14) सकाळी पावणे नऊ वाजता साई गार्डन, संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.

नलिनी हरिनाथ गोडबोले (वय 78, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वृद्ध महिला बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास संभाजी नगर, चिंचवड येथील साई गार्डन समोर थांबल्या होत्या. त्यावेळी मोपेड दुचाकीवरून दोन चोरटे आले. त्यातील दुचाकी चालवणा-याने फिर्यादी यांच्या गळ्यातील 90 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.