Pimpri

वृक्ष लागवड करून पर्यावरणाशी आदराने वागा

By PCB Author

June 06, 2021

पिंपरी, दि.०६ (पीसीबी) : वृक्ष लागवड करून पर्यावरणाशी आदराने वागण्याचा सल्ला मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती संस्थेने दिला.  जगात कोरोना महामारीमुळे अनकांचे ऑक्सिजन अभावी प्राण गेले. याला मानवी कृत्य तितकेच जबाबदार आहे. वृक्षतोडीतून निर्सगाचे हनन होत आहे यामुळे निर्सगाचा कोप होतांना दिसत आहे,आपण सर्वांनी वायुप्रदूषण टाळण्यासाठी वृक्षतोड न करता वृक्षारोपण केले पाहिजे. फक्त एक दिवस जागतिक पर्यावरण दिन साजरा न करता वर्षेभर वृक्षारोपण व संगोपन केले पाहिजे.आपल्या कुटुंबाला प्रमाणे निसर्गावर प्रेम करा,तुकाराम महाराजांनी म्हटल्या प्रमाणे “वृक्षवल्ली आम्हां,सोयरे ,वनचरे”या वुक्तीप्रमाणे निसर्गाशी आदराने वागा ,नाहीतर सर्वांना नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागेल म्हणून पर्यावरण दिन एक दिवस साजरा न करता वर्षभर, वृक्ष लागवड व संगोपन  आपापल्या परीने चालू ठेवा,आजचे पर्यावरणाचे रक्षण म्हणजे उद्याच्या तरुण पिढीच्या ऑक्सिजनची सोय असे प्रतिपादन मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा. जोगदंड यांनी वृक्षारोपण करताना केले. औध येथील जिल्हा रुग्णालय परीसरात व भोसरी तील डायनोमर्क कंपनीच्या परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी चिपको आंदोलनाचे प्रणेते व पर्यावरणवादी सुंदलाल बहुगुणा यांना आदरांजली वाहून वृक्षलागवड करण्यात आली.

शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे,संगिता जोगदंड, गजानन धाराशिवकर, मुरलीधर दळवी, डायनोमर्क कंपनीचे विभाग प्रमुख दिलीप ईधाते,हेमंत नेमाडे, राजेश वैद्य,रवी भेंकी, राहुल शेडगे,, ईश्वर सोनोने, पंडित वनसकर, तानाजी कांबळे ईत्यादी उपस्थित होते.