वीज बंद करून दिवे लावायला सांगणे हा तद्दन मूर्खपणा आहे – जितेंद्र आव्हाड

0
406

 

मुंबई, दि.३ (पीसीबी) – आज लॉकडाऊन च्या ९ व्या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. १३० कोटी जनतेच्या भारतमातेसाठी, सुदृढतेसाठी, सेवेसाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊन मधील पुढील दिवसात कटाक्षपणे घरी राहून कोरोनाला एकत्र हरवण्याचे आवाहन केले आहे.

येत्या रविवारी ५ एप्रिलला जनता कर्फ्यू च्या यशानंतर आता कोरोनाशी लढ्यासाठी कोणालाही एकटं वाटू नये, खंबीर रहावे म्हणून अजून एक मागणी मोदींनी जनतेकडून केली आहे. ती म्हणजे, रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता सर्वांनी ९ मिनिटे लाईट बंद करून दिवा, मेणबत्ती, टॉर्च, मोबाईल फ्लॅशलाईट, इत्यादींनी प्रकाश करून या कोरोनाच्या अंध:काराला दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. देश आता अंधारातून जात आहे. वीज बंद करून दिवे लावायला सांगणे हा तद्दन मूर्खपणा आहे, तसेच भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली,एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत.कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही. असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते. असे मत त्यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.