वीजपुरवठ्यासाठी अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांदया छाटल्या म्हणून महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

0
396

पिंपरी येथील घटनेत एकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल

पुणे, दि. २० (पीसीीब) : वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या विविध कामांसोबतच वीजपुरवठ्यात अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या छाटल्याने महावितरणच्या जनमित्रास फांदीच्या लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी करण्यात आले. पिंपरीमधील कामगार भवन परिसरात गुरुवारी (दि. १९) दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कर्मचाऱ्यास मारहाण तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या पिंपरी विभाग अंतर्गत अजमेरा कॉलनी शाखा कार्यालयाचे जनमित्र श्री. रामेश्वर बळीराम वाघमारे हे सहकारी श्री. अशोक मुळे तसेच दुरुस्ती कामाच्या कंत्राटदाराचे दोन कर्मचारी यांच्यासमवेत पिंपरीमधील कामगार भवन परिसरात रोहित्राची पावसाळापूर्व तपासणी तसेच देखभाल व दुरुस्तीचे काम करीत होते.

दरम्यान या रोहित्राच्या बाजूलाच असणाऱ्या झाडाच्या फांद्यांचा रोहित्र व वीजयंत्रणेला स्पर्श होण्याचा संभव असल्याने फांद्या तोडणे आवश्यक असल्याचे दिसले. याबाबत त्यांनी सहायक अभियंता सौ. सुरेखा भारती यांना कळविले. त्यांच्या सूचनेनुसार वीजपुरवठ्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या छाटण्याचे काम सुरु केले. मात्र त्याचवेळी बाजूच्या गांधीनगर झोपडपट्टीतून एक इसम आला व स्वतःचे नागराज शंकर भांडेकर असे नाव सांगत फांद्या का छाटत आहे असे विचारत शिविगाळ करू लागला. महावितरणच्या गणवेशधारी कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र दाखवून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण काहीही समजून न घेता सदर इसम रोहित्राच्या कुंपणाच्या आत आला. त्यामुळे पुढील वाद व अनर्थ टाळण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केले व दुरुस्तीचे साहित्य घेऊन तिथून निघाले. मात्र त्याचवेळी आरोपी भांडेकर याने जनमित्र श्री. वाघमारे यांच्या डोक्यावर, पायावर व पाठीवर झाडाच्या फांदीने मारहाण केली. यामध्ये श्री. वाघमारे जखमी झाले.
या मारहाणप्रकरणी नागराज शंकर भांडेकर