Notifications

विश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली?; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By PCB Author

December 09, 2018

धुळे, दि. ९ (पीसीबी) –  आमदार अनिल गोटे यांच्या वाहनावर शनिवारी रात्री दगडफेक करण्यात आली. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मालेगाव रोडवरील खासगी रूग्णालयात दाखल केले होते़. आमदार गोटे अजूनही रूग्णालयात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे़. दरम्यान, गोटे यांनी मुख्यमंत्र्यांनी विश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली? असा सवाल पत्राव्दारे केला आहे़.