विश्वजीत कदम भाजपात प्रवेश करणार? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

0
575

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम यांनी आज (शुक्रवार) सकाळी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच सांगलीतील पुर परिस्थितीची माहिती देऊन मुख्यमंत्र्यांकडे १५ प्रमुख मागण्या केल्या आहेत.  

विश्वजीत यांनी त्यांच्या फेसबुकपेजवर फोटोसहित एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये ते म्हणतात, मी माझ्या पलूस कडेगाव मतदारसंघातील पुरग्रस्त भागाच्या विदारक स्थिती बद्दल छायाचित्रे आणि व्हिडीओ च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच प्रभावी मदतकार्याबद्दल मी तयार केलेला आराखडा सादर केला. शासनाने जाहीर केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम भरपाई म्हणून मिळावी, शेतकऱ्यांची त्वरित कर्जमाफी व्हावी. शेतमजूर, व्यापारी याना आर्थिक सहाय्य केले जावे, ज्यांच्या पशुधनाची वा राहत्या घराची हानी झाली आहे अशांना मदत मिळावी, शाळांची दुरुस्ती केली जावी व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच पाठयपुस्तके मोफत मिळावीत आदी १५ प्रमुख मागण्या केल्या.

सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वार आहे. त्यात कदम आणि फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे. तसेच कदम हे भाजपात प्रवेश करतील अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.