Maharashtra

विश्वजित कदमांनी अपहरण करून उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला – अभिजित बिचुकले

By PCB Author

May 11, 2019

सांगली, दि. ११ (पीसीबी) – काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्यावर साताऱ्यातील नेते अभिजित बिचुकले यांनी धक्कादायक आरोप केला आहे. यामुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पलूस-कडेगाव विधानसभा पोटनुवडणुकीत आमदार  कदम यांनी माझे अपहरण करून जबरदस्तीने माझा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला होता, असा आरोप  बिचुकले यांनी केला आहे.

सांगलीमध्ये बिचुकले   पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की,  आमदार  कदम यांच्याकडून माझ्या कुटुंबाला धोका आहे. त्यांच्यावर कारवाई केली नाही तर, सांगलीत आमरण उपोषणाला बसणार, असा  इशाराही बिचुकले यांनी दिला आहे.

बिचकुले म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात २०१८मध्ये  पोटनिवडणूक लागली होती. या वेळी  कदम यांनी माझे अपहरण करून मला जबरदस्तीने उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. तसेच बायको, मुलगा यांचेही अपहरण आणि दमबाजी  करण्यात आली, असा आरोपही बिचुकले यांनी केला आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेताना निवडणूक कक्षात केवळ ५ लोकांना आत जाण्यास परवानगी दिली जाते. मात्र,  त्यावेळी १० ते १२ लोक कक्षात होते,  असा आरोप  बिचुकले यांनी केला आहे.