विश्वचषक पराभवानंतर भारतीय संघाला मिळणार ‘इंतकी’ रक्कम

0
622

मुंबई, दि, १३ (पीसीबी) – विश्वचषकात भारतीय संघाला १८ धांवानी पराभुत करुन न्यूझीलंडसने फायनलमध्ये मजल मालरी आहे. त्यांचा सामना १४ जुलैला इंग्लंडशी होणार आहे. वर्ल्ड कप २०१९ साठी आयसीसीने यावेळी ७० कोटींचं बक्षीस जाहीर केले आहे. या ७० कोटींपैकी भारतीय संघाला साडे सात कोटी रुपये मिळतील.

आयसीसीच्या नियमानुसार, सेमीफायनलपर्यंत मजल मारणाऱ्या म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाला ५.५ कोटी रुपये बक्षीस दिलं जातं. लीग फेजमध्ये एका सामन्यासाठी विजेत्या संघाला २८ लाख रुपये दिले जातात, तर सामना रद्द झाल्यानंतर हे बक्षीस १४-१४ लाख रुपये असं दिलं जाते. दरम्यान, टीम इंडियाला वेगवेगळ्या आधारावर ७.६० कोटी रुपये मिळतील. तसेच अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला २८ कोटी आणि उपविजेत्याला १४ कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.