विशेष गृहसचिव अमिताभ गुप्तांच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल – किरीट सोमय्या

0
441

मुंबई, दि.१० (पीसीबी) – वाधवान बंधूंना लॉकडाऊनच्या काळात महाबळेश्वरला जाण्याची परवानगी पत्र दिल्या बद्दल राज्याचे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. तर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अमिताभ गुप्ता यांच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

किरीट सोमय्या यांनी बाबतची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.