Chinchwad

विशाल ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मूकफेरी काढून शहिदांना श्रद्धांजली

By PCB Author

February 17, 2019

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – प्रभाग  क्रमांक २६ विशालनगर येथील  विशाल ज्येष्ठ नागरिक संघाच्या  वतीने मूकफेरी काढून काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद  झालेल्या  जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

सारस्वत बँक,हिंदचौक,डीपीरोड,वाकडरोड मार्गे सारस्वत बँक चौकपर्यंत  ही मूकफेरी काढण्यात आली. यावेळी प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. सारस्वत बँक चौकात  पाकिस्तान विरोधात  घोषणा देऊन भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

यावेळी नगरसेविका आरतीताई चोंधे, दिलीपशेठ बालवडकर, विशाल ज्येष्ठ  नागरिक संघाचे अध्यक्ष रंगनाथ थोपटे, व्दारकानाथ खरे, आधार पाटील,  प्रभागातील सर्व नागरिक व मान्यवर उपस्थित होते.