Desh

विशाखापट्टणम विमानतळाजवळ वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला

By PCB Author

October 25, 2018

विशाखापट्टणम, दि. २५ (पीसीबी) – आंध्र प्रदेशमधील वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख  जगनमोहन रेड्डी यांच्यावर आज (गुरुवारी) दुपारी विशाखापट्टणम विमानतळाजवळ धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात जगनमोहन रेड्डी यांच्या डाव्या हातावर वार झाला आहे.

श्रीनिवास असे हल्लेखोराचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो विमानतळाच्या कँटीनमध्ये काम करतो. जगनमोहन यांच्या डाव्या हातावर वार केल्यानंतर रक्तस्त्राव सुरु झाला . त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने विमानतळावरील व्हीआयपी कक्षात प्रवेश केला. त्यानंतर जगनमोहन यांच्यासोबत सेल्फी काढायचा आहे, असे सांगून त्यांच्याजवळ गेला. फोटो काढत आहे, असे दाखवत त्याने जगनमोहन यांच्यावर हल्ला केला. या प्रकारानंतर  एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी लगेच हल्लेखोराला ताब्यात आहे.