Maharashtra

विवेकच्या एका ट्विटने सलमानलाही टाकले मागे

By PCB Author

May 22, 2019

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – एग्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर केलेल्या एका मीममुळे अभिनेता विवेक ओबेरॉय चांगलाच वादात सापडला. एग्झिट पोल म्हणजे अंतिम निकाल नव्हे हे गमतीशीरपणे सांगणारा सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा मीम विवेकने शेअर केला होता. त्यावरून राजकीय नेत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली तर राज्य व केंद्रीय महिला आयोगाने नोटीसही पाठवली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे गुगलवर नेटकऱ्यांना विवेकबद्दलची इतकी उत्सुकता वाढली की सर्चमध्ये त्याने सलमान खानलाही मागे टाकले.

२० मे रोजी विवेकने एग्झिट पोलसंदर्भातला मीम शेअर केला होता. त्या दिवशी त्याला गुगलवर सलमानपेक्षाही अधिक सर्च केले गेले. किंबहुना तेव्हापासून विवेकच्या सर्चमध्ये वाढ झाली. गुगल ट्रेण्डच्या मते पुद्दुचेरी, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गोवा या राज्यांमध्ये विवेकबाबत सर्च केले गेले. दरम्यान शेअर केलेल्या मीमवरून होणारा वाद पाहता विवेकने ते ट्विट डिलीट कर माफी मागितली आहे.