Pimpri

विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

By PCB Author

June 14, 2021

आकुर्डी, दि.14 (पीसीबी) : विवाहितेच्या वडिलांच्या नावावर असलेली आकुर्डी येथील खोली सासरच्या लोकांच्या नावावर करण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केला. तसेच सासरच्या एका व्यक्तीने विवाहितेचा विनयभंग केला याबाबत सासरच्या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने याबाबत निगडी पोलीस ठाण्यात रविवारी दि. 13 फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता सासरी नांदत असताना आरोपींनी संगणमत करून फिर्यादी यांच्या आई वडिलांच्या नावावर असलेली दत्तवाडी आकुर्डी येथील खोली हुंड्यामध्ये सासरच्या लोकांच्या नावावर करावी. या कारणासाठी त्यांचा छळ केला. तसेच शिवीगाळ व हाताने मारहाण केली. लग्नामध्ये विवाहितेला दिलेले सोने देखील आरोपींनी विवाहितेला परत दिले नाही. तसेच सासरच्या एका व्यक्तीने विवाहितेशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. काही जणांचा फिर्यादी यांच्या लग्नाला विरोध असल्याने त्यांना क्रूरतेची वागणूक देऊन मानसिक व शारीरिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहे.