Chinchwad

विवाहितेचा छळ करुन तलवारीने कापून टाकण्याची धमकी

By PCB Author

November 15, 2018

वाकड, दि. १५ (पीसीबी) – दुकान सुरु करण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये, अशी धमकी देऊन एका २५ वर्षीय विवाहितेचा शारीरीक आणि मानसिक छळ करुन तलवारीने कापून टाकण्याची धमकी सासरकडच्या मंडळींनी दिल्याचे समोर आले आहे. ही घटना पुण्याई बंगला, योगविद्या धामजवळ, एच.पी.टी कॉलेजरोड, नाशिक येथे घडली.  

याप्रकरणी पीडित २५ वर्षीय विवाहितेने सासरकडच्या मंडळींविरोधात वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, अमित राजेंद्र कोठावदे (वय ३०), राजेंद्र गंगाधर कोठावदे (वय ५८), लता राजेंद्र कोठावदे (वय ५५) आणि पुनम राजेंद्र कोठावदे (वय २९, सर्व रा. पुण्याई बंगला, योगविद्या धामजवळ, एच.पी.टी कॉलेजरोड, नाशिक) या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २५ वर्षीय महिलेचा अमित कोठावदेसोबत विवाह झालेला आहे. मात्र कोठावदे कुटूंबीयांनी महिलेचा वारंवार शारीरीक आणि मानसिक छळ करुन माहेरुन दुकान सुरु करण्यासाठी पैसे आणण्यासाठी दबाव टाकला तसेच “आमदार आणि खासदार आमचे ओळखीचे आहेत दुकान सुरु करण्यासाठी पैसे आणले नाहीस तर तलवारीने कापून टाकण्याची धमकी दिली”. आणि पीडितेला तिच्या आई-वडिलांनी स्त्रीधन म्हणून दिलेली सोन्याची चैन, अंगठी आणि नथ जबरदस्तीने काढून घेतली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.