विरोधी पक्षांचे सरकार आल्यास तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना हवंय उपपंतप्रधानपद

0
435

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकांनंतर भाजपला बहुमत मिळालं नाही तर विरोधी पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्यास तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी होकार दर्शवला आहे. पण त्याचवेळी त्यांनी आघाडी सरकारमध्ये उपपंतप्रधानपदाची मागणी केली आहे. सतराव्या लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपले आहेत. अशावेळी पुढचे सरकार कोणाचे होणार याबद्दल राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अपेक्षित बहुमत मिळालं नाही तर देशातील विरोधी पक्षांचे आघाडी सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात २१ मेला सर्व विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर डाव्या आघाडीशी आणि काँग्रेसशी राव यांनी चर्चा केली आहे. भाजपला पाठिंबा न देता प्रस्तावित महाआघाडीला समर्थन देण्यास त्यांनी होकार दिला असून त्या बदल्यात उपपंतप्रधानपदाची मागणी केली आहे. तसं झाल्यास त्यांच्या मुलगा जगन्नाथ रावला तेलंगणाचे मुख्यमंत्री करण्यात येईल.