Maharashtra

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचाही दौरा

By PCB Author

October 17, 2020

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार हे अतिवृष्टी झालेल्या भागाचा उद्यापासून दोन दिवस दौरा करणार आहेत. दुसरीकडे आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही रविवार पासून बारामतीमधून आपल्या पाहणी दौऱ्याची सुरवात कऱणार असल्याचे जाहिर केले.

राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. १९ ऑक्टोबरपासून त्यांच्या दौऱ्याला प्रारंभ होईल.

सोमवारी देवेंद्र फडणवीस बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होणार आहेत. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी, मंगळवारी (२० ऑक्टोबर) उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्‍या दिवशी बुधवारी (२१ ऑक्टोबर) हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत 9 जिल्ह्यांमध्ये सुमारे 850 कि.मी.चा प्रवास फडणवीस करणार आहेत.