विरोधकांचे फोन टॅप करणे महाराष्ट्राची संस्कृती नाही – देवेंद्र फडणवीस

0
272

मुंबई,दि.२४(पीसीबी) – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्य सरकारने तसे कुठलेही आदेश दिलेले नव्हते” असं सांगितलं आहे. या प्रकरणात ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांची राजकारणातील विश्वसनीयता ही संपूर्ण देशाला ठाऊक आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राज्य सरकारला ज्या कोणत्या यंत्रणेमार्फत चौकशी करायची असेल, ती करायला ते मोकळे आहेत असंही ते म्हणाले आहेत.

“राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. या प्रकरणात ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांची राजकारणातील विश्वसनीयता ही संपूर्ण देशाला ठाऊक आहे. राज्य सरकारला ज्या कोणत्या यंत्रणेमार्फत चौकशी करायची असेल, ती करायला ते मोकळे आहेत. सत्य महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊक आहे. शिवसेनेचे मंत्रीसुद्धा त्या काळात गृहराज्यमंत्री होतेच. माझी एकच विनंती आहे की, तात्काळ चौकशी करून त्याचा अहवाल राज्याच्या जनतेपुढे ठेवावा. इस्त्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर तीही करावी” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींचे फोन टॅप झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.