विराट कोहलीला ‘तो’ परतल्याने अकरा जणांची निवड करणे झाले कठीण

0
808

लंडन, दि, २७ (पीसीबी) – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत  भारताचा आज वेस्ट इंडिजशी सामना होणार आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे मागच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. तो आता फिट झाला असून पुढच्या सामन्यासाठी तयार आहे. चांगल्या फॉर्मात असणारा भुवनेश्वर संघात परतल्याने टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे.

भारताच्या गोलंदाजांनी वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. भुवनेश्वर कुमारने तीन सामन्यात ५ विकेट घेतल्या आहेत. तर शमीने पहिल्याच सामन्यात हॅट्ट्रिक घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामुळे प्लेइंग इलेव्हन ठरवताना विराटची डोकेदुखी वाढली आहे. सध्या बुमराह, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार हे चौघे संघात आहेत. शिखर धवनच्या जागी विजय शंकरला संघात घेतल्यानंतर तो पाचवा गोलंदाज आहे. तर हार्दिक पांड्यानेसुद्धा गोलंदाजी केली आहे. त्यामुळे अंतिम अकरा जणांची निवड करणे कठीण झाले आहे.