विराटला संघात स्थान नाही ICC च्या पण रोहित शर्माला निवडले

0
608

नवी दिल्ली, दि, १५ (पीसीबी) – क्रिकेट वर्ल्डकप समाप्त झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसीने ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’ जाहीर केली आहे. या संघामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला स्थान मिळू शकलेले नाही. विराट कोहली आजच्या तारखेला जगातला सर्वोत्तम फलंदाज असूनही त्याला आयसीसीच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. सोमवारी आयसीसीने आपला संघ जाहीर केला. भारताकडून सलग पाच शतके झळकवण्याचा विक्रम करणारा रोहित शर्मा, जसप्रीत बुमराहला आयसीसीच्या संघात स्थान मिळाले आहे.

स्पर्धेत विराट इतक्याच ४४३ धावा करणारा इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला स्थान देण्यात आले आहे. रॉयने सात सामन्यात ६३.२९ च्या सरासरीने धावा केल्या तर विराटने नऊ सामन्यात ५५.३८ च्या सरासरीने ४४३ धावा केल्या. मँचेस्टरमध्ये न्यूझीलंडकडून १८ धावांनी पराभूत झाल्यानंतर भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मालिकावीराचा पुरस्कार मिळवणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला आयसीसीच्या संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे. माजी समालोचक इयन बिशप, इयन स्मिथ, इसा गुहा, क्रिकेटवर लिहिणारे लॉरेन्स बूथ यांनी आयसीसीचा संघ निवडला आहे.