Maharashtra

विमा कंपन्यांनी हजारो शेतकऱ्यांचा विमा नाकारला

By PCB Author

December 27, 2020

मुंबई, दि.२७ (पीसीबी) – अतिवृष्टीमुळे राज्यात ठिकठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम भरूनही त्यांना वेळेवर मदत मिळाली नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वीम्याची रक्कम दिली नसल्याचेही समोर येत आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे.

काही शेतकऱ्यांना मिळालेली विम्याची रक्कम तुटपुंजी असून शासनाला ती रक्कम परत करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी हजारो तक्रारी दाखल केल्यात आहेत.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले पण केवळ अठराशे रुपयांची मदत हिंगोलीत एका शेतकऱ्याला देण्यात आलेली आहे.

अतिवृष्टीनंतर 72 तासांत जिओ टॅगद्वारे तक्रार नोंदवली नाही म्हणून हजारो शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांनी नाकारल्याचा दावा आहे. यामध्ये परभणीतीली 22,413 शेतकरी, नांदेडचे 15,000 शेतकरी, उस्मानाबादचे 12 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे.