विमानाने येऊन वाकड परिसरात घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक

0
814

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – विमानाने येऊन दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वाकड पोलिसांनी केली असून आरोपीला उत्तर प्रदेशातील  जौनपुर येथून अटक करण्यात आली आहे.

अनिल मिश्री राजभर (वय ३६, रा. ग्राम पोस्ट बोदरी, थाना चन्दवक, तहसील केरावत जि. जौनपुर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात दोन घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्या विरोधात राज्यभरात देखील घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून २४ तोळे सोने-चांदिचे दागिने, लॅपटॉप असा एकूण ८ लाखांचा माल हस्तगत केला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश माने, पोलीस उपनिरीक्षक हरिश माने, पोलीस उपनिरीक्षक सिध्दनाथ बाबर तसेच पोलिस कर्मचारी विक्रम जगदाळे, प्रशांत गिलबिले, नितीन गेंगजे, तात्यासाहेब शिंदे, बापुसाहेब धुमाळ, विभीषन कन्हेरकर, नितीन ढोरजे, जावेद पठाण, दिपक भोसले, प्रमोद भांडवलकर, भैरोबा यादव, विजय गंभीरे, शाम बाबा, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, सुरेश भोसले आणि नुतन कोंडे यांच्या पथकाने केली.