Maharashtra

विनोद तावडेंना आपल्या गाडीत बसण्याची एक संधी द्या; मनसेचे गृहमंत्री राजनाथ सिंहांना पत्र   

By PCB Author

April 17, 2019

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आपल्या गाडीत बसण्याची एक संधी  देण्यात यावी, अशा आशयाचे पत्र मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पाठवले आहे.  यासंदर्भात काळे यांनी ट्विट करुन  माहिती दिली आहे.

काळे यांनी या पत्रात म्हटले आहे की, आपल्या सुरक्षारक्षकाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आपल्या गाडीत बसण्यास रोखल्यापासून, महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री  श्री. विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना त्वरित मानसोपचाराची गरज आहे. त्यात कहर म्हणजे आपल्या पक्षाने त्यांना राज्याचे गृहखाते सुद्धा न देता निव्वळ शिक्षण खात्यावर बोळवण केल्यामुळे ते दिवसेंदिवस बरसटत चालले आहेत.

राजसाहेबांवर आरोप करुन आपण चर्चेत तरी राहू असा ‘विनोदी’ विचार करुन तावडे सध्या बेताल बडबड करत आहेत. मात्र आता हे सारे त्यांच्या अंगलट येऊ लागले आहे. तरी कृपया आपण महाराष्ट्रात येऊन एकदा या विनोदी तावडेंना आपल्या गाडीत बसू घ्यावे. जेनेकरुन त्यांची गृहमंत्रीपद न मिळाल्याची इच्छा जरी अपूर्ण राहिली असली, तरी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या गाडीत बसण्याची इच्छा पूर्ण झाल्यामुळे, ते किमान पुन्हा समान्य माणसासारखे वागू लागतील.