विनायक मेटेंना पंकजा मुंडेंचा धक्का; दोन झेडपी सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश  

0
543

बीड, दि. २४ (पीसीबी) – भाजपवर नाराज असलेले शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांना भाजप नेत्या व राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी धक्का दिला आहे. विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाचे बीड जिल्हा परिषदेचे २ सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.   

बीड जिल्हा परिषदेमध्ये विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाचे एकूण चार सदस्य  आहेत. त्यातील एक यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  आता  विजयकांत मुंडे आणि अशोक लोढा या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली  भाजपमध्ये प्रवेश केला.

शिवसंग्राम पक्षाचा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना बाहेर काढण्यात  पंकजा मुंडेंना यश आले होते.  आता  दोन जिल्हा परिषद सदस्य भाजपात घेऊन पंकजा मुंडेंनी विनायक मेटे यांना  धक्का दिला आहे. दुसरीकडे भाजपसोबत असलेले घटक पक्ष नाराज आहेत, अशा चर्चा होत असतानाच  मुख्यमंत्र्यांनी घटक पक्षातील सर्व सदस्यांसोबत एक बैठक घेऊन नाराजी दूर केल्याची चर्चा आहे.