विनामास्क बाहेर फिरणाऱ्या 73 नागरिकांवर दंडात्मक कारवाई

0
273

पिंपरी, दि. 19 (पीसीबी) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, बाहेर फिरताना मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही विनामास्क बाहेर फिरणाऱ्या 98 नागरिकांवर पोलिसांनी शुक्रवारी (दि.18) दंडात्मक कारवाई केली.

एमआयडीसी भोसरी (07), भोसरी (01), पिंपरी (03), चिंचवड (07), निगडी (00), आळंदी (21), चाकण (00), दिघी (00), सांगवी (04), वाकड (00) हिंजवडी (15), देहूरोड (00), तळेगाव दाभाडे (13), तळेगाव एमआयडीसी (00), चिखली (00), रावेत चौकी (00), शिरगाव चौकी (00), म्हाळुंगे चौकी (00) अशी पोलीस चौकी अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईची आकडेवारी आहे.

पिंपरी चिंचवड परिसरातील निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी, बाहेर पडताना मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आहे. त्यामुळे नेहमी मास्कचा वापर करा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.