विनामास्क फिरताय मग सावधान! पिंपरी-चिंचवड पोलीस करतायत कडक कारवाई

0
579

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – मास्क न वापरणाऱ्या 348 बेशिस्त नागरिकांवर रविवारी (दि. 9) पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे.

शहरातील करोना बाधितांची संख्या आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. आदेशांचे भंग करुन मास्क न वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे.

रविवारी पोलिसांनी केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (38), भोसरी (08), पिंपरी (34), चिंचवड (30), निगडी (17), आळंदी (14), चाकण (46), दिघी (08), सांगवी (18), वाकड (08), हिंजवडी (24), देहूरोड (20), तळेगाव दाभाडे (23), तळेगाव एमआयडीसी (00) चिखली (22), रावेत चौकी (18), शिरगाव चौकी (10), म्हाळुंगे चौकी (10)