Pimpri

विनामास्क प्रकरणी 467 जणांवर कारवाई..

By PCB Author

January 17, 2022

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – विनामास्क फिरणा-यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. रविवारी (दि. 16) पिंपरी चिंचवड पोलिसांनी 467 नागरिकांवर कारवाई केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, गर्दी न करणे, उघड्यावर न थुंकणे अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र अनेक नागरिक शासनाच्या सूचना आणि आवाहनाला थेट केराची टोपली दाखवतात. त्यांना योग्य समज मिळावी तसेच कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पोलिसांकडून नियमभंग करणा-या नागरिकांवर कारवाई केली जात आहे.

 

हिंजवडी येथे एका हॉटेलमध्ये नागरिकांची गर्दी झाल्याने पोलिसांनी हॉटेल चालकावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच मास्क न वापरणा-या 467 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

पोलिसांनी केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (23), भोसरी (44), पिंपरी (41), चिंचवड (49), निगडी (68), आळंदी (49), दिघी (85), सांगवी (17), वाकड (30), देहूरोड (8), तळेगाव दाभाडे (10), रावेत चौकी (4), शिरगाव चौकी (6), म्हाळुंगे चौकी (33). तर चाकण, हिंजवडी, तळेगाव एमआयडीसी, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीन विनामास्कची एकही कारवाई करण्यात आली नाही.