Pimpri

विनापरवाना पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

By PCB Author

December 19, 2020

दिघी, दि.१९ (पीसीबी) : 30 हजार किंमतीचे विनापरवाना एक लोखंडी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जवळ बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी 21 वर्षीय तरुणाला दिघीतील मॅगझिन चौकात अटक करण्यात केली आहे.

प्रणव सुरेश कांबळे (वय 21, रा. गुरुदेव नगर, आकुर्डी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक आशिष ज्ञानदेव बनकर यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अटक आरोपीला आर्म ॲक्ट कलमाखाली ताब्यात घेण्यात आलं असून अधिक तपास दरोडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भांगे करत आहेत.