विनापरवाना गोमांस वाहतूक करणा-या दोघांना अटक; अडीच लाखांचे गोमांस जप्त

0
506

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – विनापरवाना गोमांस वाहतूक करणा-या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लाख 40 हजार रुपयांचे गोमांस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी (दि. 27) सकाळी साडेसात वाजता पुणे-नाशिक महामार्गावर पांजरपोळ येथे करण्यात आली.

मोहसीन गफ्फार सौदागर (वय 30, रा. पांगरी, ता. बार्शी. जि. सोलापूर), गौस जावेद शेख (वय 24, रा. कोंढवा, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय 27, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्यांच्याकडील पिकअप मध्ये पशुसंवर्धन विभागाचा कोणताही परवाना न घेता बेकायदेशीररीत्या जावारांचे मांस वाहून नेत होते. गोरक्षक आणि भोसरी पोलिसांनी कारवाई करत रविवारी सकाळी आरोपींचे पिकअप पकडले. त्यातून दोन लाख 40 हजारांचे सुमारे दीड टन गोमांस जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.