विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा

0
233

सांगवी,दि.२३(पीसीबी) – महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास पिंपरी येथे घडला.

गणेश मनोहर जगताप (वय 33, रा. सांगवी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 22) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला दुचाकीवरून कामावरून घरी जात होत्या. दरम्यान, पिंपरी येथे आरोपी जगताप त्यांना अडविले. ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे’, असे म्हणून जगताप याने महिलेचा हात पकडून त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदवून पिंपरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.