Maharashtra

विधान परिषदेसाठी उर्मिला मातोंडकर, आनंद शिंदे, नितीन बानुगडे

By PCB Author

November 07, 2020

मुंबई, दि. ७ (पीसीबी) : महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठीच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यांनी यांना देण्यात आला आहे. शिवसेनेच अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी या संबंधी राज्यपालांची भेट घेतली. आज दिलेल्या बारा नावात दोन नावे विशेष आहेत

वंचित बहुजन आघाडीकडून 2019 ची लोकसभा निवडणूक लढलेले यशपाल भिंगे यांचे नाव राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहे. यशपाल भिंगे यांच्यामुळे नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. तर वंचित बहुजन आघाडीकडून चंद्रपूर विधानसभा लढलेले अनिरुद्ध वनकर यांना काँग्रेसने संधी दिली.

कला क्षेत्रातील मोठी नावं अभिनेत्री उर्मिमा मातोंडकर यांचं नाव शिवसेनेकडून देण्यात आले आहे. तर गायक आनंद शिंदे यांचं नाव राष्टवादी काँग्रेसने दिलं आहे. शिवसेनेकडून शरद पोंक्षे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आदित्या ठाकरे यांच्यासाठी विधानसभेला जागा सोडलेले वरुण सरदेसाई यांची नाव देखील चर्चेत होतं.

महाविकास आघाडीकडूने देण्यात आलेली 12 नावे –

राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे (समाजसेवा आणि सहकार) राजू शेट्टी (सहकार आणि समाजसेवा) यशपाल भिंगे (साहित्य) आनंद शिंदे (कला)

काँग्रेस रजनी पाटील (समाजसेवा आणि सहकार) सचिन सावंत (समाजसेवा आणि सहकार) मुझफ्फर हुसेन (समाजसेवा) अनिरुद्ध वनकर (कला)

शिवसेना उर्मिला मातोंडकर (कला) नितीन बानुगडे पाटील विजय करंजकर चंद्रकांत रघुवंशी