Maharashtra

विधानसभेसाठी भाजपकडून १२ आयारामांना उमेदवारी

By PCB Author

October 02, 2019

मुंबई, दि. २ (पीसीबी) –  विधानसभा निवडणुकीत भाजपने  पक्षाच्या ९२ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली असून ९ जणांचे तिकीट कापले आहे. तर  राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड आदीसह १२ आयारामांना उमेदवारी दिली आहे.

कोथरूडमधून मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहाद्यातून उदयसिंह पडवी यांच्या जागी त्यांचा मुलगा राजेश पडवी, नागपूर दक्षिण सुधाकर कोहळे यांच्या जागेवर मोहन मते, अर्णीमध्ये राजू तोडसाम यांच्याऐवजी डॉ. संदीप धुर्वे, विक्रमगडमध्ये माजी मंत्री विष्णू सावरा यांच्या जागेवर हेमंत सावरा, मुलुंडमध्ये सरदार तारासिंग यांच्या जागेवर मिहीर कोटेचा, शिवाजीनगरमध्ये विजय काळे यांच्या जागेवर सिद्धार्थ शिरोळे, पुणे कॅण्टोन्मेंटमध्ये दिलीप कांबळे यांच्या जागी सुनील कांबळे, माजलगावमध्ये आर. टी. देशमुख यांच्याजागेवर रमेश अडासकर यांना संधी मिळाली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या भारत माणिकराव गावित, बापूसाहेब गोरठेकर, कालिदास कोळंबकर, रवीशेठ पाटील, हर्षवर्धन पाटील, वैभव पिचड, राधाकृष्ण विखे-पाटील, राणा जगजितसिंह पाटील, मदन भोसले, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक या १२ आयारामांना भाजपने उमेदवारी दिली आहे.